महाराष्ट्र आणि भारतातील दलित चळवळीचा आजच्या कालखंडात जर विचार करावयाचा असेल तर गेल्या सहा दशकात भारतात व जागतिक पातळीवर सामाजिक, राजकीय व सांस्कृतिक बदल कसे होत आहेत किंवा झालेले आहेत यांचा विचार करणे गरजेचे आहे. कुठलीही चळवळ ही काळाप्रमाणे बदलत असते व काळाप्रमाणे चळवळ किंवा विचार बदलत नाहीत किंवा विचारकर्ते बदलत नाहीत. तो गाढवाचा गुणधर्म ठरतो असे बाबासाहेब एके ठिकाणी म्हणतात. म्हणून काळ आणि वेळेप्रमाणे दलित चळवळीचे राजकारण, समाजकारण, अर्थकारण याचाही विचार होणे गरजेचे आहे. आजच्या स्थितीत कोणतीही चळवळ पुढे न्यायची असेल तर त्याला केडर बेस विचार मंथन, आर्थिक पाठबळ व दूरदृष्टी असणारे नेतृत्व असणे गरजेचे आहे. दुर्दैवाने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनंतर आंबेडकरी विचारधारेत गटातटाचे राजकारण सुरू झाले शिवाय संकुचित वृत्ती व इतर जातींच्या लोकांचा आंबेडकरी चळवळीकडे बघण्याचा दृष्टिकोन यामुळे चळवळ मागे पडली असे खेदाने म्हणावे लागत आहे...(पुस्तकातून)
0 REVIEWS FOR पुस्तकाचे नाव : दलित ऐक्याचे अंतर्विरोध