`जननांतर सुहृद` या पुस्तकात निरंजन घाटेवरचा लेख वगळता माझे सगळे व्यक्तिचित्रात्मक लेख घेतले आहेत. घाटेवरील `सुहृदगान` मधील लेखाचा चांगला भाग घेऊन आमच्या नात्याने गाठलेली पुढची वाईट प्रगती मी `तहानलेले पाणी` या माझ्या आत्मकथनातील `दोस्त, दोस्त ना रहा` या प्रकरणात लिहिली आहे. १९६९ साली माझ्यासाठी जो घाटे मित्र होता तो आता मित्र म्हणून राहिला नाही. वास्तविक निवृत्तीनंतर कायम वास्तव्यासाठी मी पुणे निवडले याचे कारण माझे रवींद्र सुर्वे, नागनाथ कोत्तापल्ले, निरंजन घाटे’ सौ. विजया अरुण जोशी हे मित्र पुण्यात होते. उरलेले आयुष्य मला त्यांच्या सहवासात घालवायचे होते. परंतु १९६८ साली अनुभवलेली घाटेची मैत्री हा एक भ्रम होता हे २०११ साली पुण्यास आल्यावर सिद्ध झाले. असं म्हणतात की मित्रांपेक्षा मैत्रीचा मृत्यू पाहावा लागणं हे जास्त दुःखद असतं.
- विश्वास वसेकर
0 REVIEWS FOR पुस्तकाचे नाव : जननांतर सुहृद