संस्कार
ही जगातील सर्वात मौल्यवान आणि सर्वांगसुंदर अशी गोष्ट होय. काया, वाचा, मनाची लखलखीत आभूषणेच असतात संस्कार ! त्या दिव्य तेजातून जीवनवाट प्रकाशमान होत जाते. संस्कार मिळत नाहीत बाजारात. ते मिळतात जन्मदात्रीच्या उदरातून, निसर्गाच्या पदरातून! घरणी-आकाश, सूर्य-चंद्र, वृक्ष-वेली, तारे-वारे हे सारे संस्कारच तर देतात. बालपणातील कुटुंबाचे संस्कार सावलीसारखे सदैव आपल्या सोबतीला असतात. त्यातूनच जन्मास येते संवेदनशील मन! हे सुसंकारित मन असत्य वचन बोलत नाही, वाकडी वाट चालत नाही, स्वार्थ त्याला शिवत नाही, दुजाभाव भावत नाही. चोरी-शिंदळकी करत नाही, मनात आढी धरत नाही. ते असते फुलासारखे कोमल, निर्झरासारखे निर्मळ! ते तान्ह्या लेकराची, गायीवासराची, चिटपाखराची बोली जाणते. सकल सजिवांना स्वतःचा जीव मानते. संस्कारातूनच माणूस घडतो, समाज घडतो, देश घडतो. सर्वांचे कल्याण व्हावे, विश्वात सदैव सुख-शांती नांदावी. हीच त्याची प्रांजळ मनोधारणा झालेली असते. हाच या प्रस्तुत साहित्यसंहितेचा मूळ गाभा होय!
0 REVIEWS FOR पुस्तकाचे नाव : इरवाड