पुस्तकाचे नाव : दरवळ सहवासाचा
- Category: Literature
- Author: लहू कानडे
- Publisher: Pustakmarket
- Copyright By: सौ. कविता कानडे
- ISBN No.: 978-81-970250-0-6
Free
मी आणि माझी जडणघडण ही फार मोठी गोष्ट आहे. प्रत्येक व्यक्तीचं आयुष्य अनेक संघर्षांनी भरलेलं असतं. हा संघर्ष कधी व्यक्तिगत असतो तर कधी तो सामाजिक असतो. माझंही आयुष्य अनेक सामाजिक संघर्षांनी भरलेले आहे. कवी, लेखक, कार्यकर्ता, प्रशासकीय अधिकारी आणि राजकीय नेता या माझ्या आयुष्याच्या वाटचालीत मला जी असंख्य माणसं भेटली त्यांच्या सहवासाचा दरवळ या पुस्तकात मी वाचकांपुढे ठेवत आहे. कदाचित ही भली माणसं माझ्या आयुष्यात आली नसती तर माझ्या जगण्याची दिशा काही वेगळीच असती. या ऊर्जावान माणसांनी मला वैचारिक दिशा दिली. संघर्ष करण्याची उमेद दिली. प्रेम दिले. विशेष म्हणजे माझ्या जीवनाला गतिमान केले. माणसांच्या सहवासाचा हा दरवळ आपल्या इतिहासाचा आणि वर्तमानाचाही सामाजिक दस्तऐवज आहे. असे मी मानतो. तो जपला पाहिजे, असे मला वाटते. - लहू कानडे (मलपृष्टावरून)