स्वातंत्र्य मिळाल्यानंतर नाना राजकारण, समाजकारण आणि विधायक कार्यात रमले. तर यदुनाथजी साधनेत पत्रकार म्हणून काम करता करता साधनेचे संपादक झाले. राष्ट्र सेवा दल, आंतरभारती, सर्वोदयाच्या कामासाठी त्यांनी आपला अधिक वेळ दिला. पण विचारवंत पत्रकार आणि लेखक म्हणूनच ते अधिक ओळखले गेले. लोकशाही समाजवादाची प्रतिष्ठापना ही दोघांचीही जीवननिष्ठा राहिली आणि तिला पोषक असे काम ते आयुष्यभर करीत राहिले. ही ध्येयनिष्ठा एवढी प्रबळ होती कि ते दोघेही कमालीचे साधे आणि विरक्तपणाचे जीवन जगले. त्यांचा उल्लेख अनेक जाणत्यांनी `यती यदुनाथ` असा केला आहे तर भास्करराव दुवै नाना गांधीजींचा आदर्श समोर ठेवून जगणारे संसारी गृहस्थ म्हणून ओळखले गेले.
0 REVIEWS FOR पुस्तकाचे नाव : आठवणीतले दुर्वे आणि यदुनाथाजी