मायभूमीच्या ओढीने जीवाला पडलेला वेढा हा वेगळाच असतो म्हणून सारा गांव परिसर शाळा इतर माझ्या वैयक्तिक आठवणी गोळा करण्याचा मी प्रयत्न केला अशक्य हा शब्दच माझ्या शब्दकोशात नव्हता म्हणून मला धडपड करता आली आयुष्य असेपर्यंत क्षण न क्षण जगावं असं वाटतं अनुभवातून जीवनाची जडणघडण होत गेली अहिराणी गावातील बाराबलुतेदार व इतर सर्व समाज म्हणजेच मला गदलं वाटलं त्या गदल्यावर खेळलो बागडलो घडलो पडलो झोपलो शहाणपण आलं लिहिण्यासारखं जे माझ्या टाळक्यात होतं तेवढं लिहिण्याचा प्रयत्न केला काही ठिकाणी आत्मप्रौढी झाल्यासारखंही वाटेल पण आठवणी पाठ सोडत नाहीत भरभर उडत गेल्या कधी दिसतात कधी दिसेनाशा होतात लिहिताना आत्मा ओतीत होतो
0 REVIEWS FOR पुस्तकाचे नाव : गदलं