डॉ. के. डी. ननावरे लिखित `पोस्टमार्टम ऑफ पोस्टमार्टम हे पुस्तक वाचले. पुस्तकाचे शीर्षकच सामान्य माणसाला भीतीची अनुभूती करून देते. असे वाटते. पण प्रत्यक्ष पुस्तक वाचताना कसलीही भीती वाटत नाही. उलट डॉक्टर एका वेगळ्या विश्वात वाचकाला घेऊन जातात. शवविच्छेदन हा तसा लेखनाच्या बाबतीत दुर्लक्षित विषय पण डॉक्टर या विषयातील तज्ज्ञ असल्याने आणि त्यांनी १०,००० पेक्षा जास्त शवविच्छेदन केसेस हाताळल्यामुळे मांडणी अतिशय सुरेख झालेली आहे. वाचकाचे कुतूहल जागृत करत शवविच्छेदनाबाबतची संपूर्ण माहिती लेखक वाचकांपर्यंत रंजक पद्धतीने पोहचवतात आणि केसेसच्या माध्यमातून वाचकांचे कुतूहल शमवतात. विविध प्रकारच्या शवविच्छेदनासाठी आलेल्या केसेसद्वारे त्यातील बारकावे रिपोर्ट पद्धती कोर्ट केसेसबाबतचे त्यांचे अनुभव आणि सोबत योग्य-अयोग्य बाबींचा ऊहापोह यातून लेखकाची समाज प्रबोधनाची तळमळ दिसून येते. लेखक यामध्ये यशस्वी झालेले आहेत यात शंकाच नाही. स्वतःचे अनुभव डॉ. ननावरे सरांनी शब्दबद्ध केल्यामुळे आणि सर्वच घटना सत्यावर आधारित असल्यामुळे लेखन भावस्पर्शी व बोधक झालेले आहे
0 REVIEWS FOR पुस्तकाचे नाव : पोस्टमार्टम ऑफ पोस्टमार्टम