बुद्ध आणि त्यांचा धम्म याविषयीची माझी उत्सुकता ही अशी माझ्या लहानपणापासून निर्माण झाली आहे. हे पुस्तक लिहिण्याची प्रेरणा मला निराळ्या कारणांनी मिळाली. कलकत्याच्या महाबोधी सोसायटीच्या मुखपत्राच्या संपादकांनी १९५१ साली मला त्यांच्या वैशाखी विशेषांकासाठी खास लेख लिहिण्यास सांगितले होते. त्या लेखात मी असा युक्तिवाद केला होता की विज्ञानाने जागृत झालेला समाज स्वीकारील असा बुद्ध धर्म हा एकमेव धर्म आहे. त्याविना हा समाज नष्ट होईल. मी त्यात असे विवेचन केले होते की या आधुनिक जगात बुद्धधर्म हा असा एकच धर्म आहे जो मानव जातीचे रक्षण करु शकेल. बौद्धधर्माची प्रगती अत्यंत हळू झालीचे कारण त्याचे वाड्:मय इतके आहे की ते कुणी वाचू शकणार नाही आणि ख्रिश्चनांप्रमाणे त्यांचे स्वतःचा असा बायबल सदृश ग्रंथ नाही. मी तो लेख लिहिताच तशा प्रकारचा ग्रंथ लिहिण्याविषयी अनेकांनी मला पत्राने कळविले. त्या पत्रानुसार मी हा ग्रंथ लिहिण्याचे मनावर घेतले. हा ग्रंथ किती चांगला उतरला आहे, हे वाचकांनी ठरवायचे आहे. ग्रंथात मी काही नवीन सांगितले आहे असा माझा दावा नाही. मी फक्त बौद्ध विचारांचे संपादन केले आहे. त्याची मांडणी वाचकांना आवडेल असा मला विश्वास वाटतो. मी ते सारे सोप्या आणि सहज समजेल अशा शब्दात मांडले आहे.
0 REVIEWS FOR पुस्तकाचे नाव : भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म