गत नव्वद वर्षांचा विचार करता आपल्या लक्षात येईल की चित्रपट संगीत भारतीय माणसाच्या नसानसात भिनलं आहे. स्त्री पुरूष, लहान थोर, सामान्य असामान्य अशा सगळ्यांनाच सिनेगीते आवडतात. सिनेमा न पाहणारांनासुध्दा गाणी आवडतातच. कारण त्या गाण्यांनी भारतीयांची नस अचुक पकडली आहे.
रेडीओवर अनेक गाणी ऐकत असतांना अकस्मात आपलं एखादं आवडतं गाणं कानावर पडले की होणारा आनंद. विवाहासारख्या समारंभात ग्रामोफोनवर वाजवल्या जाणाऱ्या गाण्यांचा लुटलेला आनंद. कॅसेट किंवा सीडी यांचा संग्रह करून ऐकलेली आपली आवडती गाणी असा काळ कधीचाच इतिहासजमा झालाय. गाणं ऐकता ऐकता समोरच्या टिव्हीवर पाहण्याचा योग जुळून आल्यालापण आता तीसपस्तीस वर्ष उलटलीत. हातातल्या मोबाईलवर एक टिचकी मारून यु ट्युब किंवा डेली मोशनसारख्या माध्यमातून कोणत्याही काळातलं पाहीजे ते गाणं दृक् श्राव्य स्वरुपात आपणासमोर हजर होउ शकते असा जमाना आजचा आहे. त्यानुळे हे पुस्तक वाचतांना गाणं ऐकणे आणि पाहणे असे दोन्ही अनुभव रसिकांनी एकाच वेळी घ्यावेत अशीच अपेक्षा आहे.
0 REVIEWS FOR पुस्तकाचे नाव : भँवरेने खिलाया फुल