गावाबद्दलच्या या अक्षम्य दुर्लक्षामुळे ग्रामपातळीवर आजही उच्च प्रतीच्या मूलभूत भौतिक सुविधा नाहीत ही वस्तुस्थिती आहे. आजही देशभरातील ग्रामविकासाच्या योजना प्रामुख्याने केंद्र सरकारच्या आर्थिक मदतीने व राज्यांच्या अल्पशा भागिदारीवर चालू आहेत. आमचे ग्रामजीवन हे मुख्यतः कृषीजीवन आहे. शेती हा त्याचा मुलाधार आहे. शेतकरी ज्या मातीमध्ये राबतो, त्यास तो जमिनीचा तुकडा समजत नाही तर `काळी आई` मानतो. त्याचे संपूर्ण भावविश्व कृषीसंस्कृतीने व्यापलेले आहे आणि दुर्देवाने ही शेती आजही निसर्गावर अवलंबून आहे. राज्यसरकारला ग्रामविकासासाठी अनेक योजना सुरू करून त्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची कल्पना सुचणे हे देखील अभिनंदनास पात्र आहे. तरी देखील माझ्यासारख्या ग्रामविकासामध्ये आयुष्यभर काम केलेल्या अधिकाऱ्यास राज्यातील सर्व ग्रामपंचायती यामध्ये का सहभागी होत नाहीत ? आणि सहभागी झालेल्या ग्रामपंचायती सातत्य का टिकवून ठेऊ शकत नाहीत ? याची खंत वाटते. ग्रामविकासात लोकसहभाग लाभला नाही तर ग्रामविकासाचे स्वप्नच धुळीला मिळेल एवढे निश्चित आहे.
- लहू कानडे (मलपृष्टावरून)
0 REVIEWS FOR पुस्तकाचे नाव : कल्याण कथा