या पुस्तकात अरण्य वाचवण्याची असफल लढाई आहे तशीच दोन दुर्दैवी जीवांची विफल प्रेमकहाणी आहे. माणसं हे ही प्राणीच आहेत आणि तेही निसर्गाचं एक अविभाज्य अंग आहेत. म्हणूनच या कादंबरीतील माणसं प्राण्यांशी, झाडांशी आणि निसर्गाशी बोलतात. माणसाने निसर्गाला ओरबाडण्याचा प्रयत्न केला तर काय होतं हे वेगळं सांगण्याची गरज नाही. पुस्तक वाचता वाचता ते कळेलच. हे पुस्तक निर्मितीत माझे मित्र श्री. प्रमोद भावसार यांचे मोठे योगदान आहे. मला त्यांच्या कायम ऋणात रहायला आवडेल म्हणून मी त्यांचे आभार मानणार नाही. माझी दोन्ही मुलं ओंकार आणि आदित्य यांच्या सहकार्याशिवाय हे पुस्तक पूर्ण होऊ शकले नसते म्हणून त्यांचा उल्लेख अपरिहार्य. तुम्हाला पुस्तक आवडलं तर त्याचे श्रेय त्यातील निसर्गाला आणि माणसांना. बाकी काही उणे असल्यास ते माझं न्यून. (पुस्तकातून.....)
- मुरलीधर सुतार
0 REVIEWS FOR पुस्तकाचे नाव : नैमिषारण्यात अर्ध्या रात्री