साहित्य आणि त्यातील बाङ्मय प्रकार सातत्याने बदलताना दिसतात. नवनवीन वाङ्मय प्रकारांची भर पडते आहे आणि काही काळानुसार निर्माण होणे बंद झालेले आहेत. काळ आणि ते ते वाङ्मय प्रकार यांचा अनुबंध काही प्रमाणात लावता येतो. काही वाड्मय प्रकार थोड्याफार कारणांमुळे वेगवेगळे कल्पिले गेलेले आहे. तर एकाच वाङ्मय प्रकाराचेही अनेक उपप्रकार कल्पिले गेलेले आहेत. उदा. चरित्र, चरित्रात्मक कादंबरी, चरित्रात्मक कविता, (अभंग) चरित्रात्मक कथा, चरित्रात्मक लेख इ. याचा अर्थ वाङ्मयीन समीक्षा अधिक चौकस, परिपूर्ण होत चालली आहे. म्हणून एखाद्या वाङ्मय प्रकाराची संकल्पना व्यवस्थित समजून घेणे आज गरजेचे झाले आहे. साहित्याचा समाजाच्या अंगाने आज मोठ्या प्रमाणात विचार होत असल्यामुळे त्या-त्या वाङ्मय प्रकाराची संकल्पना स्पष्ट करताना वाङ्मयीन वेगळेपणा बरोबरच ज्ञानशाखांशी त्याचा असणारा संबंध ही पाहणे आज गरजेचे झालेले आहे. त्यानुषंगाने चरित्र ही वाङ्मयीन संकल्पना वाङ्मयीन व इतर वेगवेगळ्या अंगाने पाहणे मला गरजेचे वाटले म्हणून हा लेखन प्रपंच.
ही पुस्तिका तयार करण्यासाठी अनेक व्यक्तिंनी मला प्रेरणा, सहकार्य केलेले आहे.आमच्या शिरुर शिक्षण संस्थेचे सहसचिव मा.नंदकुमार निकम, चांदमल ताराचंद बोरा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. सी. मोहिते, माझे विभाग प्रमुख प्रा.डॉ.बाळकृष्ण ललित, सहकारी प्रा. क्रांती गोसावी/पैठणकर, प्रा .डॉ .विकास नायकवडी, प्रा.डॉ.सुरज सावत, प्रा.डॉ.सिद्धार्थ कांबळे इतर सर्वच महाविद्यालयातील प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारी यांची प्रेरणा व सहकार्य मला लाभले. माझे वडिल आदर्श शिक्षक राष्ट्रपती पुरस्कार विजेते आ. विनायक खेमाजी भैलुमे (तात्या) माझी माते (आई) सौ. शकुंतलविनायक भैलुमे, सासरे आ. अशोक बाबुराव शिंदे, सासू (मम्मी) सौ. कल्पना अशोक शिंदे (मामी), थोरले बंधु आ.चंद्रशेखर भैलुमे, आ.संजय भैलुमे, वहिणी सौ. स्नेहलता भैलुमे, सौ. अनिता भैलुमे, बहिणी सौ. मीनाक्षी मिसाळ, सौ. सुनिता गजरमळा, थोरले मेव्हणे प्राचार्य डॉ. आर. एम. मिसाळ, आ.धनंजय गजरमळा माझी सौभाग्यवती सौ. विद्या राजाभाऊ भैलुमे, कन्या राई व पूर्णा या सर्वांची प्रेरणा मला सतत मिळाली. या पुस्तकाचे प्रकाशन पती-पत्नी श्री. व सौ. नेरकर या सर्वांचे आभार.
या पुस्तकाचे ईबुक करून हजारो वाचकांसमोर पोहचवण्याचे महत्वाचे काम पुस्तकमार्केट डॉट कॉम या वेब पोर्टलने केले साठी त्यांचे आभार .
-प्रा डॉ. राजाभाऊ भैलुमे
0 REVIEWS FOR पुस्तकाचे नाव : चरित्र वाङ्मय प्रकार