`साहित्य: संशोधन व समीक्षा` हा ग्रंथ आपल्या हाती देताना मला आनंद होत आहे. गेल्या पाच-सहा वर्षांत वेगवेगळ्या निमित्ताने मी काही समीक्षात्मक लेखन केले, ते येथे एकत्र केले आहे. काही लेख नव्यानेही लिहिले आहेत. पूर्वी लिहिलेल्या लेखांचे पुनर्लेखन करून, त्यात नव्या निरीक्षणची भर घातली आहे. मी ज्या विषयाचे वाचन-चिंतन करीत असे. त्या विषयांवर काही निमित्ताने लिहिण्याची उर्मी बळावते. उदा. हिंदीतील प्रसिद्ध लेखक सुरेंद्र वर्मा यांचे `सूर्य की अंतिम किरण से सूर्य की पहेली किरण तक` हे नाटक माझ्या वाचनात आले. मी त्या नाट्यानुभवाने विचारप्रक्रियेत गुंतून गेलो. मानवी मनाच्या खोल तळात बुडी मारण्याची सुरेंद्र वर्मा यांची या नाटकातील कृती अत्यंत प्रभावशाली आहे. त्यामुळे या साहित्यकृतीला सर्जक प्रतिसाद देताना बौद्धिक चिंतन सुरू राहिले.
0 REVIEWS FOR पुस्तकाचे नाव : साहित्य : संशोधन व समीक्षा