स्नेहबंध
जीवनाची वाटचाल करत असताना असा माणूस कुठेही असला तरी तो यशस्वीपणे आपली जीवननौका पार करू शकतो. मग तो पोलिसात असला काय? किंवा किर्तनात असला काय? कौटुंबिक जीवनात तर एकमेकांना आधार देऊन चालताना कधी मुलांचा मित्र तर कधी गाईड होतो. सौ. इंदुमती वहिनींची खंबीर साथ लाभल्याने सर्वच क्षेत्रात चौफेर टोलेबाजी त्यांना करता आली. पोलीस खात्यात राहून निष्कलंक जीवन जगलेले सुभाषजी सोनवणे आपल्या खात्यातील वरिष्ठांचे घनिष्ठ मित्र बनले, त्यामुळेच सेवानिवृत्तीनंतर होणाऱ्या या सत्कार समारंभानिमित्त प्रकाशित करण्यात येत असलेल्या स्नेहबंध साठी ज्येष्ठ प्रबोधनकार भाऊ थोरात, प्रा. डॉ. सुनील शिंदे, डॉ. बाबुराव उपाध्ये, प्रा. डॉ. शंकर चव्हाण, डॉ. मेहबूब सय्यद, डॉ. कैलास दौंड, मित्रवर्य बाबासाहेब सौदागर, प्रशांत वाघ, प्रा. डॉ. माहेश्वरी गावित या साहित्यिकांनी तसेच पत्रकार मित्र हेमंत मिसाळ, अजय जाजू, सचिन नन्नवरे, विनोद गायकवाड यांनी आवर्जून लेख पाठवले. आमदार भाऊसाहेब कांबळे, अरुण आहेर, शिवाजी साळवे एवढेच नव्हे तर ज्यांच्या-ज्यांच्या समवेत नोकरी केली असे खात्यातील पोलीस निरीक्षक बळीराम गीते, राहुल पाटील, पुष्पा नाईकवाडी यांच्यासह मित्रवर्य रवींद्र धस, परशुराम कुटे, यांनी सुभाषजी सोनवणे यांच्या मैत्रीचे पैलू उलगडून दाखवले तर कुटुंबातील सर्वच सदस्यांनी त्यांच्या प्रती आपले निःस्सीम प्रेम लेखातून व्यक्त केले. स्नेहबंध साकारत असतांना अनेकांचे सहकार्य, मार्गदर्शन मिळाले, त्या सर्वांचे आभार.
- सुनील गोसावी
0 REVIEWS FOR पुस्तकाचे नाव : स्नेहबंध