‘सृजन’ हा माझा दुसरा काव्यसंग्रह ई-बुकच्या स्वरूपात प्रकाशित झाला आहे याचा मला अर्थातच स्वाभाविक आनंद आहे. Pustakmarket.com या डिजिटल प्लॅटफॉर्मवरून रसिकाच्या भेटीस आलेल्या या ही संग्रहाचे रसिक मोठ्या मनाने स्वागत करतील अशी आशा बाळगतो. प्रस्तुत संग्रहातील रचना प्रेमकाव्य व निसर्गकाव्य प्रकारातील आहेत. अधेमधे भक्तिरचना आपल्या भेटीस येतात. एकांताचे क्षण सुगंधी करणाऱ्या या व्यक्तिगत पातळीवरील रचना सार्वजनिक होऊन त्या जिज्ञासू वाचकांपर्यंत पोहोचाव्यात एवढीच प्रामाणिक इच्छा मनात आहे. मनातील स्वाभाविक अमूर्त आनंद उत्कट क्षणी शब्दरूप घेतो तो शब्दरूपात कागदावर उतरवल्यावर त्याची कविता होते! कवीची मालकी तेथपर्यंतच! त्यानंतर कवितेवर रसिकांच स्वामित्व! प्रस्तुत संग्रह सिद्ध करण्यात मित्रपरिवार, आप्तेष्ट, शुभेच्छुक, हितचिंतक आणि माझी पत्नी सौ. स्नेहा व कन्या कु. कौमुदी यांचा सहभाग आहे. तो नाकारून कसा चालेल? याशिवाय, पुस्तक मार्केटच्या सहकार्याशिवाय हे कार्य सिद्धीस जाऊ शकले नसते. सर्वांचे मनापासून आभार. लोभ आहेच तो वृद्धिंगत व्हावा हीच कामना!
- सुधीर जोशी
0 REVIEWS FOR पुस्तकाचे नाव : सृजन