"आंदकोळ" हे व्यवस्थेची चिरफाड करणारं किसन चव्हाण यांचे आत्मकथन. इथल्या व्यवस्थेनं जन्मजात गुन्हेगार ठरविलेल्या `पारधी` जातीत लेखकाचा जन्म झाला आहे. या जातीत स्वातंत्र्यानंतर आजही माळरानावर टाकलेल्या पालात पोलिसांच्या व समाजाच्या मितीपोटी रात्री उजेडाचा दिवा लागत नाही. परंतु लेखकाच्या आई-वडीलांनी त्यांच्या वाट्याला आलेल्या नरकयातना मुलांच्याही वाट्याला येऊ नये म्हणून मुलांना शिक्षण देऊन पालात ज्ञानाचा दिवा लावला.... एक दिवा पेटला... एक मेनबत्ती पेटली... की हजारो मेनबत्त्या पेटवता येतात आणि मग काय? त्याच मेनबत्त्या काळ्याकुट्ट आंधाराला छेदून प्रकाशच प्रकाश देतात. किसन चव्हाण आणि त्यांचे भाऊ उच्च शिक्षण घेऊन गुन्हेगारीचा लागलेला कलंक पुसून स्वाभिमानानं इथल्या विषमतावादी व्यवस्थेशी दोन हात करत आहेत,
हे आत्मकथन फक्त भोगवटा, दुःख, वेदना, यातना सांगुन थांबत नाही तर हक्क अधिकार व सामाजिक न्यायासाठी लढायला शिकवतं, म्हणूनच हे आत्मकथन रडगाणं ठरत नसून व्यवस्थेनं वर्षानुवर्ष दावलेल्या व नाकारलेल्या बहुसंख्य शोषितांचं व उपेक्षितांचं `जीवनगाणं` ठरतं. जीवन जगावं कस ? रडत-रहत, कुढत-कुढत की लढत-लढत असं जीवन जगण्याचं तत्वज्ञान मांडणारं हे आत्मकथन पुरोगामी व परिवर्तनवादी विचाराला प्रेरक ठरणारं आहे.
0 REVIEWS FOR पुस्तकाचे नाव : आंदकोळ