महाराष्ट्र शासनाच्या स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कारांतर्गत लोक शाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार प्राप्त कवी अनंत केदारे यांचा वाग्दान हा कवितासंग्रह प्रकाशपर्वाचा ध्यास घेऊन राष्ट्रीय एकात्मता अभिव्यक्त करणारा आहे. दलित जीवन जवळून अनुभवल्याने वेदना, विद्रोह आणि नकार व्यक्त करणारी ही कविता मानवी मूल्यांना प्राधान्य देते. मानवतेचे तत्वज्ञान सांगणारी, महामानावांचा वसा आणि वारसा चालवणारी आहे. दलित चळवळीशी घनिष्ठ संबंध असल्याने एका उत्तम कार्यकर्त्याची कविता म्हणून या कवितासंग्रहाकडे पाहता येते. एक संवेदनशील कवी म्हणून त्यांची कविता समाजपरिवर्तनाचे शस्त्र उचलते, उत्थानाचे कार्य करते. विषम व्यवस्था नष्ट करून समतेचे, राष्ट्रीय एकात्मतेचे आणि शोषणमुक्त लोकशाहीचे स्वप्न पाहणारा हा कवी आहे. आयुष्याला नियतीचा खेळ न मानता जुगार समजून त्याला सामोरं गेलेल्या सारं जगून, भोगून, सोसून, पुरून उरणाऱ्या अन त्याच्या छाताडावर बसून जीवनागाणं गाणाऱ्या पूर्वज धुरंधरांच्या मूक वेदनेला अर्पण केलेल्या कवितासंग्रहाची ही ईबूक आवृत्ती.
0 REVIEWS FOR पुस्तकाचे नाव : वाग्दान