आंबेडकरी चळवळीच्या संदर्भात संशोधन करत असताना चळवळीची सर्वसमावेशकता लक्षात येते. आंबेडकरी चळवळीची ध्येय धोरणं, त्यांचे कृती कार्यक्रम व सांविधानिक कार्य या सर्व पार्श्वभूमीवर आंबेडकरी चळवळ ही किती ? सम्यक होती याची जाणीव होते. आंबेडकरी चळवळ म्हणजे फक्त अस्पृश्यांचाच विचार करणारी चळवळ असा दृष्टिकोन काही लोकांचा दिसून येतो. यातच त्यांचे अज्ञान दिसून येते. अजूनही आंबेडकरी चळवळीच्याच विविध पैलूंवर सखोल असे संशोधन होणे गरजेचे आहे. आंबेडकरी चळवळ ही समता, स्वातंत्र्य, बंधुता या तत्त्वांशी बांधील राहून काम करणारी चळवळ आहे. चळवळीने अस्पृश्य, आदिवासी, इतर मागास वर्ग, भटके विमुक्त, स्त्रिया या सर्वांचा विचार केलेला आहे. यापैकी आदिवासींबाबत आंबेडकरी चळवळीची भूमिका या विषयावर प्रकाश टाकणारे `खानदेशातील भिल्ल आदिवासी व आंबेडकरी चळवळ` हे माझे पहिले पुस्तक प्रकाशित होताना मनस्वी खूप आनंद होत आहे.
-सुनीता शांताराम सावरकर
0 REVIEWS FOR पुस्तकाचे नाव : खानदेशातील भिल्ल आदिवासी व आंबेडकरी चळवळ