कोंडमारामधील वेदनेचा प्रत्येक चित्कार हतबलतेचा टाहो आणि भयकारी दुःखाचा हंबरडा हा वाचकाच्या काळजालपाद घालतो. कोंडमारा मधील प्रत्येक कविता कमी व नेमक्या शब्दांतून खूप मोठा आशय आणि व्यथा आपल्या पोटात घेऊन कागदावर येते. ही कविता वाचताना वास्तव आयुष्यात भेटलेल्या अन्याय जुलुमाच्या तप्त विस्तवावरून हयातभर चालत राहणाऱ्या कित्येक आयाबाया मायबहिणी आपणास समोर दिसू लागतात. कोंडमारा मधल्या कवितेतली वेदना कुणाच्या तरी डोळ्यात नजरेत आपण बघितली आहे ही खूण आपल्याला आपसूक शब्दागणिक पटत जाते. आपल्या आयुष्यात आलेल्या अनेक नात्यांतील गोतावळ्यातून वेदनेचे दुःख मनाखांयावर हताशपणे बाहात असलेली स्त्री कोंडमारातील कविता वाचताना समोर प्रगटत जाते इतकी ठळक वास्तववादी कविता डॉ. शंकर चव्हाण यांच्या लेखणीतून प्रसवली आहे.
0 REVIEWS FOR पुस्तकाचे नाव : कोंडमारा