गोवर्धन चांगो भगत (दादा)
नावाप्रमाणे खरोखरचं श्रीकृष्णाने सुदर्शन चक्र करंगळीवर धरून पेललं... तसं दादानी अनेकांचे जीवन पेललं आहे. दादांच्या अस्तित्वामुळे अनेकांचे जीवनमान उजळवून निघाले आहे. सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, राजकारण, धार्मिक कार्य करताना दादांनी नेहमी दुसऱ्यांच्या भल्याचा, त्याच्या आनंदाचा विचार केला. अनेकांना नोकऱ्या मिळवून दिल्या. दादा नेहमीच प्रत्येक कार्यक्षेत्रात प्रथम स्थानावर राहिले आहेत. दिव्यातील "सामाजिक कार्याची "मुहूर्तमेढ रोवणारे" "पहिले समाजसेवक" "दिवा शीळ रस्ता" "दिवा आगासन रस्ता पूर्णतः वास आणल्याचे "पहिले मानकरी", दिव्यातील "पहिली शिक्षण संस्था" सुरू करण्याचा मान, ठाणे मा. न. पा. दिव्यातील "पहिले नगरसेवक" ठाणे मा. न. पा. चे "पहिले सभापती" तीन मराठी चित्रपटाची निर्मिती करून दिव्यातील "पहिले चित्रपट निर्माते म्हणून ख्याती, दिवा व पंचक्रोशीतील वृद्धांना "तीर्थयात्रा" घडविणारे "पाहिले ज्येष्ठ नागरिक", दिव्यातील पहिलेच पुस्तकः "अष्टपैलू दादा" या पुस्तकाचे देखील गोवर्धन चांगो भगत हे पहिले मानकरी ठरले आहेत. त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीचा अंतरंग उलघडून दाखविणारे वाचनीय, प्रेरणादायी, जीवनानुभव चरित्रकथा "अष्टपैलू दादा" म्हणता येईल.
पुस्तकातुन..
0 REVIEWS FOR पुस्तकाचे नाव : अष्टपैलू दादा गोवर्धन चांगो भगत