सौ. वर्षा जयवंत भावे या कथालेखिका म्हणून परिचित आहेत. गेल्या पंधरा वर्षापासून त्या मराठीतल्या नामवंत मासिकांत कथा-लेखन करत आहेत. त्यांच्या विविध दिवाळी अंकात प्रसिद्ध झालेल्या कथांचा वाचकवर्ग मोठा आहे. मानवी नातेसंबंधातील संवेदनशील ताणेबाणे अधोरेखित करून त्यातील सांस्कृतिक पदर उलगडून दाखविणे हे सौ.वर्षा भावे यांच्या कथांचे वैशिष्ट्य आहे. सौ.भावे या मुळ मुंबईच्या असून गेल्या पंधरा वर्षांपासून त्या गुजरात मधल्या अहमदाबाद येथे स्थायिक आहेत. त्या वाणिज्य शाखेच्या पदवीधर असून समाजातल्या अनेक घड्मोडींकडे त्या अत्यंत संवेदनशील नजरेने पहात असतात. या कथा संग्रहातील नाते, मळभ, जाणीव, आशा, प्रेमविवाह या कथा आवर्जून वाचाव्यात अशा आहेत. ई-स्वरूपात प्रकाशित झालेल्या या कथांचे मनापासून व नव्याने वाचक स्वागत करतील अशी आशा आहे.
0 REVIEWS FOR पुस्तकाचे नाव : नाते