हेलपाटं हा अनुभव नसून समाज व्यवस्थेतील सरकारी रहाटगाडग्याची एक शाश्वत प्रक्रिया आहे. ऊसाच्या कांडक्यांचं चरख्याच्या दातऱ्यातून चिपाड कसं होतं, ते जसं कांडक्याला कळत नाही. त गरीब धर्माच्या गरजू जातीतल्या सर्वसामान्य भारतीयांचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या मलिबासा माणूस या प्रक्रियेत कसा पिळवटून चिपाडासारखा होतो ते कळूनच येत नाही. यात तुमची जात, धर्म, पंथ याचा काहीच दोष नसतो. दोष असेलच तर तुम्ही गरीब, गरजू असल्याचा!
ही कादंबरी अशाच नावाच्या एका खेडूताची गोष्ट आहे. कागदी घोड्यांच्या शर्यतीत जिवाच्या आकांताने भरधाव वेगाने धावताना हेच कागदी घोडे खिदळून, हुलकावणी देवून तुमची दमछाक करतात. तेव्हा तुम्हाला लागलेली धाप प्रकटते घटना म्हणून! तर तुमचं घामेजलेलं अंग चितारतं प्रसंग बनून. या साऱ्या घटना, प्रसंग सामान्य माणसाच्या जीवनात झिम्मा फुगडी फुगडी खेळल्यासारख्या सभोवताली फेर धरताना भासतील. फक्त त्यांची जातकुळी वेगळी असेल पण अनुभूती मात्र तिच असेल जी मलिबाच्या हेलपाट्यांची आहे........(पुस्तकातून)
0 REVIEWS FOR पुस्तकाचे नाव : हेलपाटं