अशोक नामदेव पळवेकर यांची कविता आपल्या समकालीन सामाजिक-राजकीय वास्तवाची एक प्रगल्भ कालसंहिता आहे. भारतीय समाजव्यवस्थेतील आजचे वास्तव मांडताना ही कविता सभोवतालच्या सामान्य माणसांच्या जगण्यातील ताण-तणावांसोबतच समाजातील धार्मिक-जातीय असहिष्णुता, क्रौर्य, दहशत, पुरुषसत्ताक हिंस्रता आणि अलीकडच्या काळातील सत्ताधीशांच्या वर्तनातील सामाजिक-राजकीय पाखंड व मूलतत्त्ववादी विचारसरणीतून फोफावत जाणारा धार्मिक-सांस्कृतिक उन्माद व कट्टरतावाद इत्यादींच्या आत्यंतिक प्रभावाखाली उद्ध्वस्त होत जाणारी लोकशाही यंत्रणेतील सामाजिक व मानवी मूल्ये तसेच भांडवली आक्रमकता, सत्ताशरण माध्यमे-प्रशासन-न्याययंत्रणा वगैरेंची वेगवेगळी वास्तवरूपेही अत्यंत उग्र व आक्रमक स्वरूपात आपल्या स्वतंत्र शैलीने अभिव्यक्त करते.
0 REVIEWS FOR पुस्तकाचे नाव : असहमतीचे रंग