`क्रांतिगर्भाची शाहिरी` हे पुस्तक लिहिण्याची प्रेरणा मूळात शाहीर अमर शेख यांच्या जीवनसंघर्षांच्या मालिकेतून मला मिळाली. सामान्य परिस्थितीत वाढलेला असामान्य प्रतिभा लाभलेला हा शाहीर शेतकरी, कामकरी यांच्या दुःख-दैन्याचे वास्तव चित्र साकारतो. मातृभूमीवरील उत्कट प्रेमभावनेतून राष्ट्रीय जाणिवा व्यक्त करतो. स्वातंत्र्य चळवळीबरोबरच संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतही सक्रीय सहभागी होऊन डफावर थाप मारतो. उभा महाराष्ट्र आपल्या शाहिरीने पेटवितो. त्यांची शाहिरी म्हणजे पेटलेल्या वणव्यातूनही जगण्याच्या अमाप उमेदीने निघालेल्या जनसामान्यांचा जीवनप्रवाह. कधी शांत दिसणारा, तर कधी पर्वतासारख्या अडथळ्यांना गिळंकृत करणारा.
- डॉ. दुष्यंत कटारे
0 REVIEWS FOR पुस्तकाचे नाव : क्रांतीगार्भातील शाहीर अमर शेख