या संग्रहात सरांनी वेगवेगळी वृत्तं वापरली आहेत. अगदी ९ मात्रांच्या हारित या वृत्तापासून ३२ मात्रापर्यंत अनेकानेक वृत्तांमध्ये सरांनी गझला लिहिल्या आहेत. या सर्व गझलांचे वैशिष्ट्य म्हणजे त्या सर्वच प्रासादिक आहेत. सोज्वळ आहेत. लयबद्धता सांभाळून त्यांची गझल आशयातून व्यक्त होतात दिसते. त्यांची भावगीतात्मक वृत्ती जीवनविषयक श्रद्धा उत्कटता निष्ठा यातूनच त्यांची गझल फुलत-बहरत जाताना दिसते.
एखादं फूल फुलत जातं त्यासारखंच कविमन उमलत जातं. कधी ते दवात भिजतं कधी प्रकाशानं प्रफुल्लित होतं कधी चांदण्यात न्हात असतं तर कधी समाजाच्या दुःखानं मलूलही होतं. इथे मात्र प्रा. डॉ. बाळासाहेब लबडे सरांच्या फुललेल्या अशा सुगंधी गझला नेहमी तुमच्या मनात दरवळत राहतील. तुम्हालाही बकुळीच्या फुलांप्रमाणे सुगंधित करतील.
0 REVIEWS FOR पुस्तकाचे नाव : एक कैफियत