प्रत्येक महामारीनंतर, प्रत्येक महायुद्धनंतर असे घडत आले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर कोरोनानानंतरचे जग युद्धे संभाव्य जगाचा वेध घेतला आहे. आणखी हेही लक्षात आले आहे की, युगांतर घडविण्याची ताकद कोरोनात असणार नाही. अशाप्रकारे जागतिक कोरोनाने माणसाला चांगलाच धडा शिकविला आहे. तोही मानवजातीने लक्षात घ्यावा. शेवटी कोरोना ही महामारी निसर्गाशी समतोल राखण्याची व्यवस्था आहे. म्हणून अशाकाळात समतोल बिघडू देता कामा नये. हेच व्यवहारिकदृष्ट्या मोलाचे आहे. शेवटी हे सांगावेसे वाटते साथीची दुःखे सांगण्याची वेळ नाही. आपण एकोप्याने, एक दिलाने, एक मनाने वागून, एकमेकाला मदत करीत जगू या माणसांशी माणसाप्रमाणे आणि निसर्गाची होणारी लुट थांबविणे एवढे जरी झाले तरी, कोरोनाने शिकवलेला धडा आणि त्याचापासून बरेच काही शिकलो हेच म्हणावे लागेल. या माझ्या नोंदी नोंदवल्या आहेत. याहून काही नोंदी असणार आहेत. हेही आपण लक्षात घ्यावे.
हा कोरोनाचा कोरोना काळातील प्रवास व कोरोनोत्तर काळातील त्याचे अवशेष हे सारे विसरून मार्गस्थ होऊ या. ‘शुभाहस्ते पंन्थाना: संतू’
संपादक : प्राचार्य डॉ. प्रकाश कुंभार
0 REVIEWS FOR पुस्तकाचे नाव : कोरोनानंतरचे जग