गतवर्षीच्या अतिविशेष परिस्थितीत म्हणजे करोनाची महाभयंकर साथ, लोकसंचारबंदी अन कुंठीत मनोवस्थेत केंद्रसरकार व पंतप्रधान मोदी यांच्या धोरणाने व निर्णयाने कमालीचे अस्वस्थ होत राहिलेले माझे मन फेसबुकवर व्यक्त होत राहिले. गंभीर वैचारिक टीका टिप्पणी करता करता कधीमधी कविता पोस्ट करीत होतो. या सर्व कवितांची नोंद ठेवीत गेलो. ती नोंद म्हणजे हा कवितासंग्रह होय.
मी कविता लिहित असेन यावर माझ्या अनेक सन्मित्रांना विश्वासही ठेवणे कठीण आहे. माझ्या कविताही गद्य लेखन किंवा वक्तृत्वानेच भरलेल्या असतील असेही त्यांना वाटू शकते कारण त्यांनी मला वैचारिक लेखनाच्या व भाषणाच्याच माध्यमातून स्वीकारले आहे. त्यांच्यासाठी कवी म्हणून कसा असेल, हे माझ्यासाठीच एक कोडं असेल. पण मला अशा आहे की, ते आणि इतर वाचकही कवितेचे स्वागत करतील.
-यादवराव गायकवाड
0 REVIEWS FOR पुस्तकाचे नाव : फेसबूकातील कविता