बदलते शिवार हे विष्णूपंत गायखे यांचे विविध क्षेत्रात त्यांना आलेल्या अनुभवांचे कथन आहे. यामध्ये प्रामुख्याने बदलत्या गाव, शिवाराचे चित्रण आहे. पळसे हे त्यांचे गाव नाशिक महापालिकेच्या हद्दीलगतचे शहर आणि खेडे या सीमा रेषेवर उभे असलेले. शहरीकरणाचे वारे या गावात आल्याने इथल्या लोकजीवनावर आणि मसंस्कृतीवर त्याचे चांगले-वाईट परिणाम होऊ लागलेले, नवीन पिढीने हे बदल स्वीकारले तर आधीच्या पिढीला न रुचल्याने ते अस्वस्थ झालेले. पन्नास-साठ वर्षांतल्या ग्रामसंस्कृतीतले हे बदल विविध लेखांमधून गायखे यांनी अचूकपणे टिपले आहेत. गावखेड्यातील माणसांचे गमतीदार अनुभव, त्यांच्या खोडी-नाडी, हेवेदावे, संघर्ष, त्यांचं दुटप्पी वागणं-बोलणं, प्रेम जिव्हाळा, त्यांच्या जीवनातील सुख-दुःख यांचं प्रत्यकारी वर्णन या लेखनात पाहावयास मिळते. ते वाचताना मन कधी गहिवरतं, हळहळतं. बदलत्या ग्रामसंस्कृतीचा आणि ग्रामसंस्काराचा हा दस्तऐवज मुळातून वाचावा, असाच झालेला आहे. मराठी वाचक बदलते शिवार या लेखसंग्रहाचे स्वागत करतील, असा मला विश्वास वाटतो.
विजयकुमार मिठे (ज्येष्ठ ग्रामीण साहित्यिक)
0 REVIEWS FOR पुस्तकाचे नाव : बदलते शिवार