काळोखाच्या मस्तकात कळ उठल्याप्रमाणे
निर्दयपणाला जाग आली आहे
भांबावलेल्या काळाचे पोट वरखाली हलत आहे
नरम कोवळे भक्ष्य सापडल्याप्रमाणे
असमाधानाच्या हिंस्त्र जनावराने
मला आपल्या पंजात पकडून ठेवलं आहे.
- पोपट सातपुते
मराठी साहित्यात भक्तिचळवळीवर विपुल लेखन झाले आहे. सूफींवरही काही ग्रंथ प्रकाशित झाले आहेत. सूफींवरील साहित्यात ऐतिहासिक दृष्टीकोन स्वीकारलेला आहे. भक्तिचळवळ आणि सूफीचळवळ यांची तौलनिक तपशीलवार चर्चा मात्र झालेली नाही. “एकाच पथावरील दोन पंथ : भक्ती आणि सूफी प्रस्तुत ग्रंथाने ही उणिव भरुन काढली आहे. तसेच भक्ति आणि सूफी तत्वज्ञानाच्या तौलानिक अभ्यासावर भर दिला आहे. सर्व धर्मांचे साध्य एकच आहे. या सत्याचे जे आकलन भक्ती व सूफी चळवळींना केले आहे, त्याचा गोषवारा या ग्रंथात घेतला आहे. भक्ती चळवळी असणारा भारतीय बाज आणि सूफी चळवळीस आंतरराष्ट्रीय मंथनातून प्राप्त होणारा भारतीय बाज बव्हंशी एकच असला तरी त्यांमधील काही सूक्ष्म विचलनांची नोंदही या ग्रंथात आहे, इतर धर्मांच्या आदरात स्वधर्मांचा आदरही आहेच. याचा प्रेमाने आग्रह धरणारा हा ग्रंथ....(पुस्तकातून)
0 REVIEWS FOR पुस्तकाचे नाव : एकाच पथावरील दोन पंथ : भक्ती आणि सूफी