मिलिंद कसबे या नावाचा लक्ष्यार्थ एक जबाबदार वाङ्मयाभिरूची आणि जीवनाभिरूची असाच घेणे मला नेहमीच आवश्यक वाटलेले आहे. अभिरूची हे सर्वोच्च नैतिकतेचेच दुसरे नाव आहे. ही नैतिकताच त्यांच्या साहित्यात प्रकटते. मिलिंद कसबेंची वाङ्मयीन वाटचाल ही त्यांच्या जिवंत अर्थशोधाचीच वाटचाल आहे. त्यामुळेच त्यांच्या लेखनात निष्ठांचे आणि कष्टांचे लावण्य उगवत राहते. “साहित्य आणि लोककला: मार्क्स-आंबेडकरी दिशा या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या निमित्ताने मी मिलिंद कसबे यांचे अंतःकरणपूर्वक अभिनंदनही करतो आणि त्यांना सदिच्छाही देतो.
0 REVIEWS FOR पुस्तकाचे नाव : साहित्य आणि लोककला: मार्क्स-आंबेडकरी दिशा