शिक्षणाने आज नवीन पिढीला अस्तित्व आणि अस्मितेची ओळख करून दिली आहे. शिक्षण घेतलेल्या माणसामध्ये अन्याय, अत्याचार, जातीभेद यांच्या विरोधात संघर्ष करण्याची ताकद असते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या याच विचारांचा धागा या कादंबरीच्या कथानकात दिसतो. जातिभेदाचा इतिहास बदलण्याची धमक शिक्षण घेतलेल्या पिढीमध्ये निर्माण झाली आहे. हेही कादंबरीकाराने आपल्या प्रगल्भ विचाराच्या पाठबळावर परखडपणे मांडले आहे. प्रस्थापित समाजव्यवस्थेला प्रचंड धक्का देत नवपरिवर्तनाचा विचार रुजविण्याचे सामर्थ्य या कादंबरीत दिसते. प्रेमात जात कशी अडसर ठरते ही गोष्ट आजच्या आधुनिक काळातही मनाला चटका लावून जाते आणि जातीभेदाचे मूळ अजूनही कितौ खोलवर रुजली आहेत या वास्तवाची जाणीवही ही कादंबरी करून देते. गैर मार्गाचा तसेच आर्थिक बळाचा व सत्तेचा वापर करून पाशवी जय कसा मिळवला जातो याचे भयानक दर्शन लेखकाने कादंबरीत घडवले आहे. प्रशासकीय व्यवस्थेला लागलेली भ्रष्टाचाराची कीड तसेच नितीमान माणसाला आजच्या जगात जगणे किती कठीण आहे याचे वास्तव लेखकाने कुशलतेने रेखाटले आहे.
- प्रा. डॉ. मधुचंद्र भुसारे
0 REVIEWS FOR पुस्तकाचे नाव : माणसा आलो तुला जागवाया