स्वप्नपूर्ती
केव्हा तुझ्या ओठावर हास्य फुलेल?
उद्युक्त मी त्या क्षणास, कळी जेव्हा तुझी खुलेल
गौरवर्णांच्या गालांवर गुलाबी केव्हा उमटेल?
आरक्त मी चाखावयास, नूर जेव्हा पलटेल
औत्सुक्य रवीदर्शनाचे त्या मनकवड्या सुर्यफुलास
उत्फुल्ल तशी तू केव्हा असशील ममदर्शनास?
उल्हास मला निमुळत्या वाटेवरती हात तुझा पकडण्याचा
उत्स्फूर्त भावना तुझ्या, छंद मला कमरेस विळखा घालण्याचा
उत्प्रेरक बोल तुझे, गुंग मला करण्यासाठी
उन्मादक श्वास तुझे, धुंद मला करण्यासाठी
उसंत न मजला यातून घरट्याकडे फिरण्याची
उबदार आसरा तुझा, निश्चित मला होण्यासाठी
उमदे येऊ दे हसू गालावरती, स्वप्नपूर्ती माझी होण्यासाठी
(पुस्तकातून)
0 REVIEWS FOR पुस्तकाचे नाव : स्वप्नपूर्ती