`निखाऱ्यांचा उठाव` या कवितासंग्रहातील बहुतांश सर्वच कवितांमागे एक अपरिहार्यता आहे. संजय जाधव यांच्या मनाची सर्व घुसमट, या मनातील सर्व संताप या कवितासंग्रहामधून व्यक्त होताना दिसतात. अनेक ठिकाणी काव्याचे देदीप्यमान स्फुल्लिंग आपल्याला चकित करून जातात. अशी ठिकाणे कवीने पुढे नेण्याची आणि अशी अनंत ठिकाणे परत नव्याने निर्माण करण्याची गरज आहे.
या कवितासंग्रहात कालपर्यंत झालेल्या शोषणाच्या उत्कट नोंदी कवीने केल्या आहेतच पण आजच्या जागतिकीकरणाच्या आगीत जळणाऱ्या जिवांचेही आक्रंदन कवीने भेदक शब्दांमधून मांडले आहे.
- डॉ. यशवंत मनोहर
0 REVIEWS FOR पुस्तकाचे नाव : निखाऱ्यांचा उठाव (कवितासंग्रह)