गेली साडेतीनशे वर्षे रामदास हे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु होते अशा प्रकारचा अपप्रचार रामदास समर्थक ब्राह्मण विचारवंतांनी आणि लेखकांनी केलेला आहे व याला इतिहासात कोणताही आधार मिळत नाही. रामदास हे शिवाजी महाराजांचे गुरु होते हा शोध फक्त रामदासभक्त ब्राह्मणांनाच लागलेला आहे. या अनुषंगाने ब्राह्मण लेखक त्यांच्याच बाजूने रामदास हे शिवाजी महाराजांचे गुरु होते असे म्हणत आलेले आहेत. शिवाजी महाराजांच्या बाजूने रामदास हे शिवाजी महाराजांचे गुरु होते असे कोणीही म्हटलेले नाही. हीच मंडळी रामदासांना गुरु म्हणून शिवाजी महाराजांच्या गळ्यात बांधत आहेत.
केवळ रामदासांचा संबंध शिवाजीमहाराजांबरोबर लावल्यामुळेच रामदास काही अंशाने चर्चेत राहिले आहेत. अन्यथा रामदासांची चर्चा व्हावी अशी कोणतीही गोष्ट रामदासांच्या जवळ नव्हती किंवा रामदासांच्या अंगी तसे गुणही नव्हते. रामदासांनी महाराजांना महाराष्ट्र धर्म सांगितला असा खोटा प्रचारही गेली साडेतीनशे वर्षे महाराष्ट्रातल्या ब्राह्मण मंडळींनी केलेला आहे. वास्तविक महाराष्ट्र धर्माची मांडणी रामदासांच्या अगोदर तीनशे, साडेतीनशे वर्षे महिकावतीच्या बखरीत आलेली आहे. स्वत:ला लेखक, विचारवंत, बुध्दीवान समजणाऱ्या या ब्राह्मण मंडळींनी ही गोष्ट लपवून ठेवावी याचे आश्चर्य वाटते. रामदासांच्या लिखाणाविषयी मी कारकुनी हा शब्द वापरला याचीच आत्यंतिक चीड या रामदास भक्त ब्राह्मण मंडळींना आली आहे. ज्या लिखाणाचा समाजाच्या जीवनाशी, सुखदुःखाशी संबंध नाही, ज्याला शेवटच्या माणसाच्या वेदनेची जराही जाणीव नाही. त्या लिखाणाला कारकुनी म्हणायचे नाही तर काय म्हणायचे ? रामदासांनी लिहिलेल्या दासबोध वगैरे ग्रंथात अनेक भाकीते केलेली आहेत. अनेक उपमा, विशेषणे वापरली आहेत परंतु त्या समाजाच्या वास्तववादी जीवनाविषयी किंवा त्या काळातल्या सामाजिक जीवनाविषयी रामदासांनी गांभीर्यने काही लिहिले अथवा काय केले असे कुठेही दिसत नाही
- पार्थ पोळके
0 REVIEWS FOR पुस्तकाचे नाव : चिकित्सा रामदास स्वामींची