माझा हा चौथा कविता संग्रह आपल्या हाती देतांना आत्मिक समाधान लाभत आहे. कविता हा समृद्ध व लोकप्रिय असा साहित्य प्रकार आहे. शिक्षणामुळे व्यक्तींच्या जाणीवा विकसित झाल्या. त्याचे पडसाद काव्यातून उमटायला सुरुवात झाली. कवितेत अनेक नवे प्रयोग होऊ लागले. अनेक क्व-कवींच्या कवितांनी रसिकांना वेड लावले. मराठी कवितेच्या प्रवाहात प्रचंड तळमळीने लिहिणारे कवी निर्माण झाले त्यामुळेच कवितेचा उद्याचा भविष्यकाळ उज्वल असल्याचे सहजपणे जाणवते. कवितेत एकंदरीत जीवनाची दाहकता, वास्तव, दुःख, दारिद्य, कष्ठ, अनेक प्रश्न, समाजजीवनातील विविध समस्या इत्यादींवरील कवितांनी रसिकांना अंतर्मुख केले. कविता ही जीवनमूल्यांचे प्रतिबिंब आहे. कविता समाजाला बऱ्याच गोष्टी शिकविते. असा हा वाड्मय प्रकार सर्व वाचकांना सुपरिचित आहेच.
मधुचंद्र भुसारे
0 REVIEWS FOR पुस्तकाचे नाव : काहूर