आतला आवाज म्हणजे जॉन गोन्सालविस यांनी निरनिराळ्या विषयांवर जे प्रामाणिक चिंतन केले आहे असे लेख आहेत. मग त्यामध्ये त्यांचे बालपण त्यावेळची परिस्थिती याबद्दल ते गेले ते दिन गेले ह्या भावनेने हुरहुरीने लिहितात. त्यामुळेच कंदिलाचा प्रकाश’ त्यांना अजूनही मोहवतो. एका घास काऊचा एक घास चिऊचा अशा लेखातून त्यांना त्यांचे बालपण दिसते. पण त्याचबरोबर आजच्या जमान्यात मुलांना हे सांगणारे आई-बाबा वा आजी-आजोबा दुर्मीळ होत चालले आहेत याची त्यांना खंत वाटते. ह्या संग्रहातल्या सगळ्या लेखांची ही भूमिका आहे. त्याच्या जोडीलाच ते ह्या निमित्ताने येणाऱ्या पिढीशी संवाद साधतात. दोन पिढीतील अंतर आजकाल जास्तच वाढत चालले आहे ही त्यांची व्यथा आहे आणि ही त्रुटी कमी होण्याकरिता आपले विचार मांडतात. हे मांडताना जॉन गोन्सालविस यांची भूमिका केवळ भाषण देणे अशी नसून
काहितरी पेरतची जावे अशी आहे. आणि त्यात ते यशस्वी ठरले आहेत. पेरलेले पटीत मिळते ह्यानुसार जॉन गोन्सालविस यांचे हे लेख वाचल्यानंतर वाचकांच्या मनातील विचारांना देखील धुमारे फुटतात.
0 REVIEWS FOR पुस्तकाचे नाव : आतला आवाज