दलित कथांचे भावविश्व जरी एका विशिष्ट वर्गापुरते, समाजापूरते मर्यादित स्वरुपाचे असले तरी पुढे व्यापक पातळीवर वर्ण आणि वर्ग यांच्यामुळे निर्माण झालेल्या विशिष्ट समाजसमुहाच्या त्या वेदना आहेत हे प्रथम लक्षात घेतले पाहिजे. उच्चवर्ण्य समाजामध्ये जे आर्थिक दृष्ट्या कमकूवत आहेत उपेक्षित आहेत दरिद्री आहेत जे उच्चवर्णी असुनही दरिद्री म्हणून याच स्वरुपाच्या मानसिक तणांवांना सामोरे जात आहेत. त्यामुळे दलित कथांची संवेदनशिलता जरी विशिष्ट वर्गापुरती मर्यादित स्वरुपाची असली तरी ती पुढे सर्व अपेक्षित समाजाचे प्रतिनिधित्व करतांना प्रकर्षाने जाणवले, याच ठिकाणी दलित आणि ग्रामीण साहित्याचे अतूटस्वरुपाचे नाते आहे. डॉ. आनंद यादव आम्हाला शिकवत असतांना नेहमी म्हणत असत दलितांना लोक फक्त शिवुन घेत नव्हते वास्तविक त्यांची आणि आमची आर्थिक परिस्थीती सारख्याच स्वरुपाची होती दोघे सोशिक होते. परंतु या मध्येही जातीचे दुःख हे अधिक माणसिक तणावाचे असते सर्व काही एक सारखे असतानाही केवळ जात अस्पृश्य असल्यामुळे अपेक्षित ठेवले जाते, प्रगतीची सर्व दारे बंद केली जातात.शंकररावांचा सर्वात आवडता वाङ्मय प्रकार म्हणजे कथा हा होय, त्यांनी असंख्य कथा लिहल्या. त्या ललित, दलित, ग्रामिण स्वरुपाच्या आहेत. शंकरराव खरातांच्या प्रत्येक कथेला या मातीचा गंध आहे. या मातिमधील सामाजिक तणाव, सांस्कृतिक आकृतीबंध त्यांच्या कथामधुन आविष्कृत होतो. गाव तिथे महारवाडा महारवाङ्याला आपण वेगळे करु शकत नाही. नाही तर मग तराळकी कोण करणार? सांगावा कोण पोचवणार? या समाजाने लोकसंस्कृती लोक कला जतन करुन ठेवल्या आहेत, याला अपेक्षित ठेऊन चालनार नाही.... (पुस्तकातून)
0 REVIEWS FOR पुस्तकाचे नाव : श्री. शंकरराव खरात यांच्या कथा वाङ्मयाचा अभ्यास