प्रा. डॉ. राहुल गोंगे हे माझे चांगले संशोधक विद्यार्थी असून गेल्या तीस वर्षांपासून ते माझ्या वैचारिक सहवासात आहेत. एक मितभाषी परंतु जिज्ञासू अभ्यासक म्हणून डॉ. राहुल गोंगे यांचा मला नेहमीच अभिमान वाटत आला आहे. महाराष्ट्रातील सामाजिक, सांस्कृतिक व राजकीय व्यवस्थेचा अत्यंत बारकाईने अभ्यास करून त्याला संशोधनात्मक दर्जा प्राप्त करून देणाऱ्या तरुण अभ्यासकांपैकी डॉ. गोंगे हे एक आहेत.
`संविधानाचे अंतरंग` हे त्यांचे पुस्तक सर्वसामान्य माणसांसाठी व विद्यार्थ्यांसाठी फार महत्त्वाचे आहे असे मी मानतो. संविधानाची सैद्धांतिक चर्चा करून त्याची अंमलबजावणी सर्वसामान्य माणसाच्या मनातून जोपर्यंत होत नाही तोपर्यंत संविधानाचा हेतू सफल होणार नाही. डॉ. राहुल गोंगे यांचे हे पुस्तक भारतीय संविधानाचा प्रचार तर करतेच परंतु ते जनमाणसांना समजावून सांगण्याची लोकशिक्षकाची भूमिकाही ते घेते हे महत्त्वाचे आहे.
वाचक या पुस्तकाचे स्वागत करतील असा विश्वास आहे.
प्रा. डॉ. सुरेंद्र जोंधळे राजकीय विश्लेषक, माजी विभाग प्रमुख, राज्यशास्त्र विभाग, मुंबई विद्यापीठ.
0 REVIEWS FOR पुस्तकाचे नाव : संविधानाचे अंतरंग