भीमरायांचा मळा या लेखनाची कुळकथाही चिंतणीय आहे एक तर मी तानसेन नाही किंवा तसाच चांगल्या अर्थाने कानसेन नाही. एवढेच नाही तर साधा न्हानी घरातील गायकही नाही. अशी व्यक्ती चक्क आंबेडकरी गीताचा आशय, अर्थ तथा अन्वयार्थाची मीमांसा करणारे लेखन करील, ही बाबच नवलाची वाटावी. हे खरे असले तरी, वाङमयीन सृजनाविष्काराला प्रेरीत करणारी आहे. प्रज्ञा प्रतिभेला प्रवाही गतीरूप देणारी आहे. याशिवाय काही प्रमाणातील गुढ भाव स्थितीचा हा एक उत्कट आविष्कार आहे. त्याचे निमित्त मात्र असे की, चळवळीसाठी प्रबोधनपर गीत रचना करणाऱ्या गीतकाराच्या शब्दांचे अवकाश किती अन कसे विस्तारलेले असते त्याचे काही भास मनाला झाले. त्यानंतर मग गीताचा गेय संगीतानुकूल भाग सोडुन आशय अन अर्थाबाबतचे विचारचिंतन सुरू झाले. मग काही निवडक गाणी माझ्या चिंतनशील सृजनाविष्काराचा विषय झाली.
.
-यादव गायकवाड
0 REVIEWS FOR पुस्तकाचे नाव : भीमरायांचा मळा