आंबेडकरवादी विचारप्रणाली मानवी जीवनाच्या समग्र पैलूंचा आढावा घेत त्यांना व्यवहारिक समाजाभिमुखतेचा मार्ग दाखविते. आंबेडकरवाद पारंपारिक तत्त्वज्ञानासारखे केवळ काही निवडक जनसमुदायाचे प्रतिनिधित्व करीत नसून दलित, पिडीत, वंचित, स्त्रीया यांसारखे उपेक्षित व इतर समाज घटकांच्या उत्थापनाचे मनसुभे रवतो.
आंबेडकरवाद केवळ पुस्तकी दर्शनशास्त्र नाही, तर बुद्धाच्या धम्मासारखी मानवी जीवनाला सकारात्मक दृष्टी देणारी जगण्याची पध्दत आहे. समता, स्वातंत्र्य, बंधूभाव व न्याय या तत्यांवर आधारित नव्या समाजव्यवस्थेचा मूवं आविष्कार म्हणजे अबेिडकरवाद, भारतासारख्या बहुसांस्कृतिक समाजव्यवस्थेला वैचारिक पाठबळ देणारा भकम आधार मागने आंबेडकरवाद आहे.
आंबेडकरवादाचे प्रतिबिंब अलिकडे ज्ञानाच्या विविध शाखांमध्ये उमटू लागले आहे. कलाक्षेत्रात, विशेष साहित्यात, आबेडकरवाद नवा रोमहर्षक विचार म्हणून पूढे येत आहे. आंबेडकरवादाने प्रेरित झालेल्या कलावंतांनी डॉ. आंबेडकरांना अभिप्रेत असलेला नवा माणूस (New Man) निर्माण केला आहे. नवा, निर्भव, निरोगी, समृद्ध, सजग, बुध्दिमान, यशस्वी, सबळ, समर्थ, व धिरोदात्त माणसाची ही नवी प्रतिमा आबेडकरवादी कलासाहित्यात प्रकळते. आंबेडकरवादी साहित्यसमीक्षा याच नव्या माणसाचा शोध घेत कला बाड्मयाची मीमांसा करते.
आआंबेडकरवादाचे विस्तृत विवेचन करून त्या निकषांवर समकालीन साहित्यकृतींचा विचार करणारा हा ग्रंथ मराठी वाङ्मयीन समीक्षा क्षेत्रात मौलिक योगदान रावा असा विश्वास वाटतो.
-बी.रंगराव
0 REVIEWS FOR पुस्तकाचे नाव : आंबेडकरवादी साहित्यसमीक्षा