महाराष्ट्रातील महार, मांग मातंग हे शूर आणि लढवय्ये होते. ते राज्यकर्ते होते. त्यांनी कित्येक युद्धात शौर्य गाजविले. असे असताना षडयंत्र आणि कपट नीतीचा वापर करून अत्यंत निर्दयीपणे त्यांना हीन-दीन बनविण्यात आले. त्यांनी कधीही उठाव करू नये म्हणून मनुस्मृतीसारख्या ग्रंथांची निर्मिती करून व्यवसायाच्या आधारावर निर्माण करण्यात आलेल्या जात-वर्गांचे रुपांतर जातीमध्ये केले. या जातींवर अंतर्गत विवाह पद्धतीचे निर्बंध लावून लोकांना जातीअंतर्गत बंदिस्त करून ब्राह्मणवादाचे गुलाम बनविले. त्यांना जबरदस्तीने अज्ञानात आणि मूलभूत हक्कांपासून वंचित ठेवण्यात आले. त्यांचे अनेक जातींमध्ये विभाजन करण्यात आले. परंतु ब्राह्मण वर्णाचे मात्र अनेक जातींमध्ये विभाजन करण्यात आले नाही, ही बाब लक्षात घेतली पाहिजे.(मलपृष्ठावरून)
-
0 REVIEWS FOR पुस्तकाचे नाव : बुद्धप्रिय मातंग राजा : महाराजा प्रसेनजित