डॉ. इंद्रजित जाधव यांचे `आदिवासी विकास आणि योजना` हे पुस्तक शासन, घोरणकर्ते, अभ्यासक यांना या दृष्टीने विचार करण्यास प्रेरणा देईल. भविष्यातील आदिवासी विकासाच्या योजना तयार करताना आदिवासींच्या शाश्वत विकासाचा प्राधान्याने विचार करुन त्यांच्या जीनवमूल्यांवर घाला न घालता त्यांनी वर्षानुवर्षे जतन केलेली निसर्ग जतनाची, पर्यावरण संरक्षण व संवर्धनाची मूल्ये सर्व समाजाच्या शाश्वत विकासासाठी कशी वापरता येतील याचाही विचार व्हायला हवा. असा विचार करण्यासाठी हा ग्रंथ निश्चितच चालना देईल असा विश्वास वाटतो. डॉ. इंद्रजित जाधव यांचे अशा या समयोचित ग्रंथनिर्मितीसाठी मनःपूर्वक अभिनंदन.
- प्राचार्य डॉ. कैलास नरहरी बवले
0 REVIEWS FOR पुस्तकाचे नाव : आदिवासी विकास आणि योजना