भारतीय मुस्लिम समाजाच्या आर्थिक-सामाजिक स्थितीचे आकलन करताना दारिद्र्य, शैक्षणिक व रोजगारातील मागासलेपणा तसेच सच्चर समिती अहवालात नमूद केल्याप्रमाणे काही निर्देशकांमध्ये त्यांची स्थिती इतर समाजघटकांच्या तुलनेत अधिक प्रतिकूल स्थितीत असल्याचे दिसून येते. या पार्श्वभूमीवर प्रस्तुत पुस्तकात मुस्लिम समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक स्थितीचा विविध अहवाल, शासकीय आकडेवारी आणि संशोधनपर साहित्याच्या आधारे सखोल अभ्यास करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. प्रस्तुत विषयाची मांडणी करताना उपलब्ध विश्वसनीय स्रोतांचा आधार घेऊन वस्तुनिष्ठ दृष्टिकोन ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. या पुस्तकाचा उद्देश समाजातील वास्तव परिस्थितीचा अभ्यास करून त्या संदर्भातील महत्त्वपूर्ण प्रश्न, आव्हाने आणि विकासाच्या संधी यांचे विश्लेषण करणे हा आहे.
0 REVIEWS FOR पुस्तकाचे नाव : भारतीय मुस्लिम समाजाच्या आर्थिक -सामाजिक स्थितीचेआकलन