प्रा. डॉ. सोमनाथ कदम यांनी अतिशय परिश्रमपूर्वक या पुस्तकातील सर्व लेखाचे लेखन, संशोधन केले आहे असे म्हणता येईल. काही लेख अधिक सखोल विश्लेशण करून मांडता आले असते, असे म्हणायला वाव आहे. मात्र त्यांनी या बहुसंख्य लेखांच्या द्वारा अभ्यासकांना अण्णा भाऊ साठे यांच्याकडे बघण्याच्या विविध दृष्टिकोनाबाबत दिशा दाखवून दिली आहे, तेच त्यांचे या सर्व लेखनामागील एक प्रमुख उद्दिष्ट होते असे म्हणता येईल. त्यामुळे सखोल विश्लेशण करणे, चिकित्सा करणे ही अपेक्षा या लेखांमधून करता येत नाही हे मान्य करता येईल. अण्णा भाऊ साठे यांच्या समग्र लेखनाचा अभ्यास करणाऱ्या संशोधक व अभ्यासकांसाठी हे पुस्तक निश्चितच मार्गदर्शक ठरेल असा विश्वास वाटतो. यासाठी डॉ. सोमनाथ कदम यांचे अभिनंदन आणि त्यांच्या भावी लेखनासाठी शुभेच्छा!
- प्रवीण दशरथ बांदेकर
0 REVIEWS FOR पुस्तकाचे नाव : अण्णा भाऊ साठे साहित्य आणि तत्वज्ञान