“अंधारातील प्रकाशवाटा" ह्या पुस्तकातून लेखकाने विचारांची सक्षमता, सकारात्मकता, जीवनाकडे बघण्याचा आणि तसे जगण्याचा अत्याधुनिक कालसुसंगत दृष्टीकोन मांडला आहे.` प्रत्येक व्यक्तीच्या वर्तन व्यवहाराचे सूत्र विचारांशी जोडलेले असते. लेखकाने ह्यापुस्तकातील प्रत्येक प्रकरणातून साध्या-सोप्या, सरळ पण प्रभावी भाषेत मांडले आहे. वय, अनुभव, शिक्षण, निरीक्षणाने आयुष्याचे क्षितिज विस्तारत जाते. तेव्हा व्यक्तीस सकस आणि उपयुक्त विचारांची गरज असते. त्याचा नेमका वेध ह्या पुस्तकातून पानो-पानी घेतला आहे. ज्ञानेश्वर माऊलींनी सर्वाना उद्देशून ईश्वर निष्ठांची मांदियाळी असा उल्लेख केलेला आहे. तसाच सखोल आणि व्यापक उद्देश ठेवून “अंधारातील प्रकाशवाटा" हे पुस्तक लेखकाने लिहिले आहे. प्रत्येक वाचकास यातून आगळा-वेगळा वैचारिक आनंद आणि ऊर्जा मिळते. वाचक आयुष्य सुखी-समाधानी, आनंदी आणि समृद्ध करण्याच्या दिशेने वाटचाल करण्यास प्रेरित होतो!
0 REVIEWS FOR पुस्तकाचे नाव : अंधारातील प्रकाशवाटा