माझी आई द्रौपदा विश्वनाथ त्रिभुवन हिचे वयाच्या साठाव्या वर्षी म्हणजे ७ नोव्हेंबर २०११ रोजी दुपारी १.३० वा. निधन झाले. याचे तीव्र दुःख मला निश्चितच झाले. तेव्हा माझे वय ४३ वर्षांचे होते. म्हणजे माझ्या आयुष्यात तिचे अस्तित्व ४३ वर्षे होते पण हेच विधान दुरुस्त करून लिहायचे झाल्यास तिच्या साठ वर्षांच्या आयुष्यात ४३ वर्षे ती माझ्याचसाठी झिजली. वयाच्या १५ व्या वर्षी ती त्रिभुवन कुटुंबात लग्न होऊन आली. (तिची जन्मतारीख उपलब्ध नाही) तेव्हापासून ती ७ नोव्हेंबर २०११ पर्यंत झिजतच राहिली. ज्या वयात तिचा प्रपंच सुरू झाला ते वय तिचे प्रपंचाचे नव्हतेच, ते तर खेळण्या-बागडण्याचे आणि मन व शरीर बनण्याचे वय. पण तरी देखील ती त्या काळातील रितीनुसार त्रिभुवन कुटुंबात माझ्या बापाची बायको म्हणून दाखल झाली. तिच्या बापाने (विश्वनाथ दुशिंग) ती पाळण्यात असतांना माझ्या वडिलांच्या बापाच्या (भिवाजी त्रिभुवन) हातात हिला ठेवून वचन दिले ही पोर तुझ्या विश्वनाथाला दिली आणि या वचनपूर्तीचा प्रवास म्हणजे वयाच्या १५ व्या वर्षीच माझी आई माहेर सोडून सासरी दाखल झाली.....(पुस्तकातून)
0 REVIEWS FOR पुस्तकाचे नाव : आई! तू होतीस तेव्हा...