पण ह्या गादीला वारस कोण ठेवायचा? घरचा वादी, लंका दहन’ म्हणी प्रमाणे नातेवाईकच कपट कारस्थाने करत होते. इंग्रज धूर्त! त्यांनी मार्ग शोधला, राणीला दत्तक पुत्र द्यायचे ठरविले. चौथ्या महारांजाच्या पत्नी आनंदीबाई राणी साहेब यांना यशवंतराव दत्तक दिले. शास्त्राचे सर्व नियम पाळून १८ मार्च १८७४ रोजी दत्तक समारंभ थाटात पार पडला. आता यशवंतरावांचे मूळ नाव बदलले हाते. यशवंतराव आबासाहेब घाटगे ह्या ऐवजी छत्रपती उपाधीने शाहूमहाराज नाव त्यांना मिळाले. त्यांचा राज्यभिषेक व्हायला देखील दहा वर्षांचा काळ लोटला. २ एप्रिल १८९४ रोजी ब्रिटीश सरकारने खरी मान्यता दिली. करवीर घराण्याचे नववे छत्रपती म्हणजेच शाहूमहाराज झाले. ...(पुस्तकातून)
0 REVIEWS FOR पुस्तकाचे नाव : छत्रपती राजर्षी शाहूमहाराज