डॉ. विजय खरे यांच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि राष्ट्रीय सुरक्षा या ग्रंथाचे महत्त्व याच्यासाठी आहे की, डॉ. खरे हे संरक्षण आणि सामरिक शास्त्राचे अभ्यासक असल्यामुळे त्यांच्या ज्ञानशाखेचा अद्ययावत माहितीच्या प्रकाशात त्यांनी बाबासाहेबांच्या सुरक्षाविषयीच्या विचारांकडे पाहिले आहे. त्याचप्रमाणे, बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर या विषयात कोणते प्रमुख अभ्यास झाले, जागतिक आणि भारतीय राजकारणात कोणकोणती स्थित्यंतरे झाली आणि या सर्वांच्या समीक्षेतून बाबासाहेबांचे विचार आजही किती समर्पक आणि दिशादिग्दर्शक आहेत याची त्यांनी मांडणी केली आहे. त्यांच्या मांडणीला जसे गेल्या पन्नास वर्षातील त्यांच्या ज्ञानशाखेच्या झालेल्या विकासाचे अभ्यासपूर्ण संदर्भ आहेत तसेच जागतिक आणि भारतीय वास्तवात झालेल्या परिवर्तनांची ठोस रूपातील साक्षही आहे.
डॉ. खरे सुरुवातीला राष्ट्रीय सुरक्षिततेच्या संकल्पनेच्या झालेल्या विकासाची माहिती आपल्याला देतात. इ.स. १९९० च्या अगोदर राष्ट्रीय सुरक्षा म्हणजे आपल्या देशाचे सार्वभौमत्व टिकवणे, त्याचे परकीय शत्रूंपासून संरक्षण करणे, राष्ट्राची एकता आणि अखंडता टिकवणे आणि या मार्गात येणाऱ्या सर्व धोक्यांना आपल्या क्षमतेनुसार द्यावयाचे उत्तर होय असे मानले जायचे....(पुस्तकातून)
0 REVIEWS FOR पुस्तकाचे नाव : डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि राष्ट्रीय सुरक्षा