या पुस्तकात व्यावहारिक मराठीचे पुढील मुद्दे घेतलेले आहेत. त्यात निबंध लेखन अर्ज लेखन पत्र लेखन इतिवृत्त माहितीपत्रक जाहीर निवेदन सारांश लेखन भाषांतर जाहिरात लेखन पारिभाषिक संज्ञा आणि उत्कर्षवाटा या पुस्तकाचा थोडक्यात आढावा घेतला आहे. कोणतीही भाषा ही व्यावहाराची भाषा झाल्याशिवाय ती टिकून राहत नाही. म्हणूनच मराठी ही शासकीय - सामाजिक व्यावहाराची महत्वाची भाषा व्हावी यासाठी विविध पातळ्यांवर जाणिवपूर्वक प्रयत्न चालू आहेत. कारण भाषेतूनच समाजाची संस्कृती आचार विचार व्यवहार जीवनशैली वेगळेपण इत्यादींचे जतन होत असते. भाषेचे अस्तित्व धोक्यात येणे म्हणजे त्या समाजाचे त्यांच्या संस्कतीचे जीवनपद्धतीचे वेगळेपणाचे स्वातंत्र्य धोक्यात येण्यासारखे असते. भाषा कधीच श्रेष्ठ कनिष्ठ नसते
0 REVIEWS FOR पुस्तकाचे नाव : भाषा साहित्य आणि कौशल्य विकास