भारतीय राज्यघटना (संविधान) आपल्या देशाच्या निती-नियमांची मार्गदर्शक आहे. म्हणूनच तो आपल्या देशाचा सर्वांत महत्वपूर्ण ग्रंथ आहे. एवढेच नव्हे तर जगातील सर्वात मोठी राज्यघटना आहे.
सदर राज्यघटनेतील अनुसूचींचे सरळ सोप्या भाषेत पद्यामध्ये रचना करण्याचा छोट्याशा प्रयत्नाने वाचकांसमोर सादर करण्याचा प्रयत्न केला आहे. हे भारताचे संविधान काव्यरुपात" केले आहे. यामध्ये २३८ अनुच्छेदांच्या मुळ स्वरुपाला धक्का न लावता पद्यामध्ये करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे सदरची रचना सर्वसामान्य व्यक्तीला समजण्यास सोपी जाईल असा मला विश्वास वाटतो.
सदर काव्याची रचना करण्यासाठी आमचे मित्र राजाभाऊ जाधव यांनी मनःपूर्वक सहकार्य केले आहे. त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे.
मी आशा व्यक्त करतो की, सर्व मराठी बंधू भगिनींना “भारताचे संविधान काव्यरुपात" या काव्य संग्रहाचा निश्चित लाभ होईल. सदर काव्याचा अर्थ शासकीय कामकाजात उपयोगात आणता येणार नाही. याची कृपया नोंद घ्यावी.
(भारद्वाज तथा बी. वाय. पगारे)
0 REVIEWS FOR पुस्तकाचे नाव : भारताचे संविधान (काव्यस्वरूपात)